डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर भ्याड हल्ला


 


मुंबई 08.07.2020 - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा' वर काळ संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.


काळ संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.


 आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.


आज MTBF कार्यकते नागसेन माला व इतर आंबेडकर अनुयायिनीं माटुंगा पोलीस ठाणे मध्ये आधिकाऱ्यांना भेटून हल्लेखोरांना तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी केले आहे त्यांचे संघटनेला पण उजागर करणे म्हणून विनंती केले आहे.


वंचित बहुजन आघाडीचे मुंबई कार्यकतें गुज्जेटी अशोक पद्मशाली,ऑल इंडिया आंबेडकर युवाजना संघाम महाराष्ट्र अध्यक्ष बी. बी . राजू , शंकर संटी, वड्डी सुर्यनारायणा, हेमंतकुमार बद्दी, मुळनिवासी माला व इतर महाराष्ट्र तेलुगू  भाषिक आंबेडकर अनुयायिनीं जाहीर निषेध व्यक्त केले.