रविंद्र रोकडे
अनुयायी
बाबासाहेबांचा अनुयायी मी, अन्यायावर लाथ मारीन !
शिक्षणाचं बाळकडू पितो मी, अन्यायाचा घात करीन !
बाबासाहेबांचा अनुयायी मी, विकासाचे कार्य करीन !
गरीब, दीनदुबळ्या दलितांना मी, शिक्षणास सहाय्य करीन !
बाबासाहेबांचा अनुयायी मी, समाजास जागृत करीन !
अमानुष रूढी, परंपरेचा विनाश करण्यासाठी, लोकास संघटीत करीन !
बाबासाहेबांचा अनुयायी मी, अयोग्य शासनप्रणालीस आव्हान करीन !
लेखणी हेच माझे शस्त्र, संघर्ष मी करीन !
बाबासाहेबांचा अनुयायी मी, स्वातंत्र्य,समता,बंधुतेचा स्विकार करीन !
लोकशाहीची शासनप्रणाली हि, अखंड भारतात राबवीन !
बाबासाहेबांचा अनुयायी मी, विचार त्यांचे चोहीकडे पसरवीन !
न्याय, हक्क, अधिकाराचा उपभोक्ता मी, कायद्याचे राज्य गौरवीन !
- रविंद्र रोकडे (विलेपार्ले)